ब्रेकींग : हाताने गळा दाबून पत्नीचा खून; पतीला अटक

वरणगाव/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरात पिण्यासाठी आणलेली दारू पत्नी व एका महिलेने पिल्याच्या कारणावरून रागातून पतीने गळादाबून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणानजीक घडली आहे. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून वरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम (वय-४०) रा. उत्तरप्रदेश ह.मु. हतनुर धरण ता.भुसावळ असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की,   जितेंद्र गंगाराम हेमब्रम रा. उत्तरप्रदेश ह.मु. हतनुर धरण ता.भुसावळ हा आपल्या पत्नी शांतीदेवी यांच्यासोबत वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याने घरात दारू पिण्यासाठी आणून ठेवलेली होती. ही दारू पत्नी शांतीदेवी हेमब्रम यांनी एका महिलेसाबत पिली होती.  याचा राग असल्याने जितेंद्र हेमब्रम याने पत्नीला चापटाबुक्क्यांसह कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली तर हाताने गळादावून तिचा खून केला. ही घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता राहत असलेल्या पत्र्याच्या खोलीत घडली. दरम्यान वरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून संशयित आरोपी जितेंद्र हेमब्रम याला अटक केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नावीद अली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आशिष आडसुळे हे करीत आहे.

Protected Content