धावत्या रेल्वेखाली आल्याने परप्रांतीय तरूणाचा दुदैवी मृत्यू

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने झारखंड येथील ३७ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना  १८ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कडुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या काशी एक्सप्रेस (क्रं. १५०१८) यातुन प्रवास करणारे उमेश बन्सी राणा (वय – ३७) रा. बेको ता. पिपचो, जि. कोडरमा (झारखंड) हे धावत्या एक्स्प्रेस मधुन अचानक पडल्याने रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३८२ / १६ / १८ नजीक (वडगाव बु” शिवार) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी यांचेसह जय मल्हार रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार व अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व अमोल पाटील यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मुकुंद परदेशी हे करीत आहे. मयत उमेश बन्सी राणा हे नाशिक येथे फर्निचर कामासाठी जात असतांनाच ही दुर्दैवी घटना घडली असुन उमेश बन्सी राणा यांचे पाश्चात्य आई, वडील, पत्नी, दोन मुलं, दोन मुली, पाच भाऊ असा परिवार आहे.

 

Protected Content