जळगावात क्रेडीट कार्डधारकाला ८० हजाराचा ऑनलाईन गंडा

जळगाव प्रतिनिधी । अक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एका तरूणाला ८० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सैय्यद वसीम आबिद अली (वय-३५) रा. अक्सा नगर मेहरूण जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियासह राहतो. एमआयडीसीतील स्पेक्ट्रम कंपनीत कामाला आहे. एप्रिल २०२१ मध्ये त्यांनी एका नंबरवरून अक्सीस बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी ८ हजार रूपयांचे कूपन लागल्याचे सांगितले. यासाठी तुम्हाला आठ हजार आगोदर भरावे लागतील असे सांगितल्यावर सैय्यद वसीम यांनी त्यांच्या खात्यावर ८ हजार रूपये ऑनलाईन टाकेल. काही दिवसानंतर सैय्यद वसीम यांनी एका पोस्टाद्वारे प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दोन कूपन व एक घड्याळ आले. 

दरम्यान काल बुधवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा एका नंबरवरून फोन आला की अक्सेस बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुम्हा कुणीतरी कुपन पाठवून फसवणूक केल्याचे सांगून इतरांच्या तक्रारी आल्या आहे. फसवणूक झालेल्या लोकांना त्यांचे पैसे परत करत असून तुमचा क्रेडीट कार्डचा नंबर सांगा असे सांगितले. त्यावर सैय्यद वसीम यांनी १६ अंकी नंबर सांगितला असता त्यांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातून ५० हजार आणि ३० हजार रूपये वर्ग झाल्याचे दिसून आले. 

आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर सैय्यद वसीम यांनी गुरूवार २ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली व अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतूल वंजारी करीत आहे.

Protected Content