Home क्राईम गेंदालाल मिल परिसरातून एकाची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा

गेंदालाल मिल परिसरातून एकाची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा

0
48

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात एकाच्या घरासमोरू अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना घडली असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोज शंकर कामथे (वय-३९) रा. रेणूका माता मंदीराजवळ, गेंदालाल मिल परिसर, हे मेकॅनिकचे काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ बीडब्ल्यू ३१८० ) क्रमांकाची दुचाकीचा वापर करतात. २६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता कामावरून घरी आले व दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविली. दुचाकी चोरी झाल्याचे २७ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound