चाळीसगावात सुनेच्या नांदण्यावरून पतीसह सासूला मारहाण

चाळीसगाव, प्रतिनिधी : सुनेच्या नांदण्यावरून खटला न्यायालयात सुरू असतांना पती व सासूबाई दुचाकीवरून घरी येत असतांना कोदगाव शिवारातील एकाच्या शेतात नातेवाईकांकडून मारहाण झाली असल्याची घटना २ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बारकु काळे (रा. हनुमानसिंग राजपुतनगर ता. चाळीसगाव) हे पत्नी, मुलगा, सुन‌ व त्यांची दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांचा लहान मुलगा राकेश काळे हा नौकरीस असल्याने त्याच्या कुटुंबासह माथेरान जि. रायगड येथे राहायला आहेत. मात्र गेल्या एक वर्षापासून त्याची पत्नी उज्वला काळे हि आपल्या माहेरी (रा. मुल्लेर ता. सटाना) आहे. तिच्या नांदण्यावरून न्यायालयात खटला हे सुरू आहे. दरम्यान दि. २ मे रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास पती राकेश बारकु काळे व सासूबाई बेबाबाई बारकु काळे हे मोटारसायकलने घरी येत असताना कोदगाव शिवारातील एकाच्या शेतात सुन उज्वला राकेश काळे हिच्या नांदण्यावरून १) बबलू उर्फ कल्पेश दगा कदम २) विक्की दगा कदम ३) दगा खंडु कदम ४) जनबाई दगा कदम रा. सर्व (रा. हनुमानसिंग राजपुतनगर ता. चाळीसगाव) आदी नातेवाइकांकडून मारहाण करण्यात आली. त्यातील आरोपी क्र.१ यांनी राकेश ह्याला दुचाकीवरून ओढल्याने ते खाली पडले. त्यात त्यांना दुखापत झाली. लागलीच इतर तिघांनी हाता चापटांनी व बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत बेबाबाई बारकु काळे यांचे गळ्यातील पोत तूटून नुकसान झाले. याबाबत बेबाबाई बारकु काळे यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे करीत आहे. 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.