मोटारसायकल रॅली काढणाऱ्या आठ जणांवर पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकात मोटारसायकल रॅली काढण्यापुर्वीच आठ दुचाकीधारकांवर पोलीसांनी कारवाई करत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल बुधवार १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील काव्यरत्नावली चौकात आठ ते दहा जण एकत्र घेवून दुचाकींवर संत गाडगेबाबा चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान झेंडे घेवून घोषणाबाजी करणाऱ्यांना काव्यरत्नावली चौकात गस्तावर असलेल्या रामानंद नगर पोलीसांनी अडवणूक केली. कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास मदत केल्याप्रकरणी शुभम मिलींद पवार (वय-२५) रा. केदार नगर, पिंप्राळा, स्वप्निल दिलीप खंडारे रा. पिंप्राळ हुडको, शुभम संजय शिरसाळे, विशाल भिमराव खैरनार, रा. पिंप्राळा हुडको, जितेंद्र शरद सोनवणे रा. आसोदा जळगाव, अनुराग मांगो सोनवणे रा. शिरसोली जळगाव, अनिरूध्द अनिल गाढे (वय-१८) रा. समता नगर आणि विक्की चवदास सोनवणे रा. शिरसोली या आठ जणांवर पोलीस शिपाई अतुल पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करीत आहे. 

 

Protected Content