बिल्दी धरणाजवळ दोन मोटरसायकलच्या अपघातात एक ठार, चार जखमी

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  बिल्दी धरणाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होवुन यात एक जण ठार तर  चार जण गंभीर झाल्याची घटना घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे हे करीत आहे.

घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास बिल्दी गावानजीक असलेल्या कृष्णासागर धरणाच्या पुलावर बजाज फोर. एस. चॅम्पियन कंपनीची मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ एन. २३०३ व हिरो होंडा स्प्लेंडर  क्रं. एम. एच. १९ डी. आर. २५९२ या  दोन मोटारसायकलींचा समोरा समोर धडक होवुन यात गोराडखेड ता. येथील रहिवाशी व ह.मु. बिल्दी ता. पाचोरा येथील  विशाल मनमोहन पाटील (वय-२०) यांचा मृत्यू झाला. विशाल पाटील यांचे काका शशिकिरण देवराम पाटील यांनी विशाल यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषित केले. तर उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा व जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विनोद शिंदे करीत आहेत.

 

 

Protected Content