दोन दुकानांमधून चोरी करणारे अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । येथील बाजरपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत दोन दुकानांमध्ये चोरी करणार्‍या तिघांना पोलीस पथकाने आज सापळा रचून अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, बाजारपेठ पो स्टे भाग५ गुरण ६०१/२०२० व गुरण ६०२/२०२० भादंवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक १९ जून रोजी रात्री आठवडे बाजार मधील अप्सरा दुकानचा मागे फिर्यादी दिलीप घनश्याम उदासी (रा.हनुमान नगर भुसावळ) यांच्या गोडाऊचा पत्रा वाकून आत मधून कोणी तरी ५९,००० रूपये मूल्य असणारे बेंटेक्सचे दागिने चोरून नेले होते. दरम्यान, दुसरे फिर्यादी बिलाल शहा मुझ्झफर शहा वय-३० रा गौसिया नगर भुसावळ याचे ही भुसावळ शहरातील आठवले बाजार भागत अप्सरा दुकानच्या मागे कोणी तरी अज्ञात चोरांनी त्याच्या गोडाऊन मधून १० हजार रूपये असणारा ऐवज चोरून नेला होता. याबाबतही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, याबाबत बाजारपेठ पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन संशयित आरोपी सोनू मोहन अवसरमल (वय-२२ रा.वाल्मिक नगर भुसावळ); आकाश बाबुराव इंगळे (वय-२८,रा.राहुल नगर भुसावळ) व चेतन पुंजाजी कांडेलकर (वय-२९ रा.पंचशील नगर भुसावळ) यांना राहूल नगर भागातून सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपी म याच्या पोलीस कोठडी दरम्यान दोही गुन्ह्यातील गेला माल एकूण ६९०००/-रु चा भुसावळ शहरातून राहूल नगर मधील आरोपी आकाश इंगळे याच्या घरातून काडून दिले आहे. या गुन्ह्यात १०० टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, पोना किशोर महाजन, रमण सुरळकर,समाधान पाटील, पो का विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content