जनता कर्फ्यूत आरोग्य सेवेसाठी रोटरी जळगाव ईस्टचा पुढाकार

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूत रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून अत्यावश्यक रुग्ण सेवेसाठी रोटरी जळगाव ईस्टने पुढाकार घेतला आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांना त्वरित वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून मोफत ऍम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील यांनी दिली.

गंभीर स्थितीतील रुग्णांच्या मदतीसाठी गरजूंनी रोटरी जळगाव ईस्टच्या पदाधिकारी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधल्यास ते डॉक्टर ऍम्ब्युलन्ससह रुग्णाच्या घरी पोहचतील. रुग्णावर घरीच उपचार करण्यासारखी स्थिती असल्यास घरीच उपचार करण्यात येतील. अथवा रुग्णांना संबंधित दवाखान्यात ऍम्ब्युलन्समध्ये घेवून जाण्यात येईल. या सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या हस्ते रविवारी सकाळी स्टेडीयमजवळ होईल. ऍम्ब्युलन्स सेवेसाठी माजी मंत्री गिरीश महाजन व जी.एम.फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे.
गरजूंनी अध्यक्ष विनोद भोईटे-पाटील (९७६३३७६३५४), सचिव वीरेंद्र छाजेड (९४२३५२१९४४), डॉ.जगमोहन छाबडा (९८९००३४९००), डॉ.श्रीधर पाटील (९८२३०९२१३९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय गांधी यांनी केले आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच हजार मास्क व सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचे करोना संबधी घेतलेल्या उपाययोजनसंबंधी बैठकित रावेरचे आ.शिरिष चौधरी यांनी जाहीर केले उद्या रविवार पर्यंत मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content