आकाशवाणी चौकात ट्राफिक जाम

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्याच्या मुख्यालयी राष्ट्रीय महामार्गावर आकाशवाणी चौकात आज सकाळी ८/९ वाजे पासूनच बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसेससह शहरातील वाहनधारकांना, नागरिकांना ट्राफिक जामला सामोरे जावे लागले. तर कधी न दिसणाऱ्या
वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक नियंत्रित करतांना त्रेधातीरपिट उडाल्याचे दिसून आले.

माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदि अनेक मंत्री जिल्ह्यात दाखल होत आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार हे विधानसभा निवडणुकानंतर दुसऱ्यांदा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार हे वेगवेगळ्या मार्गाने आले होते.

गेल्या सप्ताहात पवार यांच्या निवासस्थानी संपकरी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते, तसेच दोन दिवसापूर्वीच लोडशेडिंग च्या मुद्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात मुख्यालयी महत्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामागार्वरील आकाशवाणी चौकात तसेच राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाकडून येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

आकाशवाणी चौकात शरद पवार यांच्या स्वागतासाठी तसेच अवजड हार उचलून घालण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील काव्यरत्नावली चौकातून येणारे वाहनधारक, धुळे, एरंडोल तसेच भुसावळ, पाचोरा अन्य ठिकाणाहून येणारे बसेस वाहनधारकांना मात्र या वेळी अडथळ्यांचा सामना करावा लागला, तर पोलिसांची देखील भर उन्हात तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.

Protected Content