घरभेद्यांवर कारवाई करा…अन्यथा येत्या पाच दिवसात पक्षांतर- खडसे

eknath khadse

जळगाव प्रतिनिधी । भाजपमधील घरभेद्यांवर कारवाई करा अथवा आपण पाच दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाला दिला असून याबाबतची माहिती पत्रकारांना दिली.

एकनाथराव खडसे यांनी नागपूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाआघाडीच्या विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यानंतर ते दिल्लीत गेले होते. त्यानंतर जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, माझा पक्षावर मुळीच राग नाही, परंतु ज्या भाजपत एकनिष्ठ राहून मी पक्ष वाढवला तेथे सत्ता आल्यानंतर माझ्या विरोधात षड्यंत्र रचून बदनाम केले. ज्यांनी हे कारस्थान केले त्यांची नावानिशी तक्रार मी पक्ष नेतृत्वकडे केली आहे. त्यांच्यावर पक्षाने कारवाई न केल्यास आपण येत्या पाच दिवसांत पक्षांतर करण्याचा निर्णय घेऊ. पक्षाने त्या लोकांवर कारवाई केली तर ठीक अन्यथा माझ्याकडे पर्याय आहेत. सत्तेतील तिन्ही पक्ष मला निमंत्रण देत आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत आपण आपली भूमिका घेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

Protected Content