जामनेर तालुक्यात विविध आजार तपासणी शिबीराचे आयोजन

jamner news 2

जामनेर प्रतिनिधी । सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, अलर्ट इंडिया व फेअर मेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जामनेर तालुक्यात कुष्ठरोग शोध, उपचार विकलांगता आणि विकृती प्रतिबंध शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या मोहिमेची सुरुवात तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर येथे महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी सोनवणे, डॉ.योगेश राजपुत यांच्या हस्ते करुन करण्यात आले.

परिसरातील कुष्ठरुग्ण शोधुन उपचार करणे, संशयित रुग्णांचे निदान करणेव त्यांना उपचारावर आणणे तसेच कुष्ठरोगामुळे काही विकृती आली असल्यास त्याबाबत काय व कशी काळजी घ्यावी व कोणत्या उपाययोजना याबत प्रशिक्षण देणे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर प्रमाणेच, प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी, प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद, प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदूर्णी येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर येथे एकूण 75 रुग्णांपैकी 52 रूग्ण तपासण्यात आले पैकी 5 रुग्ण मृत झालेले आहे. यावेळी अलर्ट इंडिया प्रकल्प अधिकारी कमलेश चव्हाण, तालुका समन्वयक भरत पाटील, रजनीकांत पाटील, जीवन पाटील, हेमांगी भोळे, लौकिक महाजन, अमित कानडे, एम.यु.नेहते, पी.टी. भोकरे या सर्व तज्ञ टीमकडून रुग्णांची तपासणी करून त्यांना सविस्तर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

यांनी घेतले परिश्रम
डॉ.धनंजय राजपूत, डॉ.किरण धनगर, डॉ.कुणाल बाविस्कर,भागवत वानखेडे, आवळाबाई चौधरी, सुनीता पाटील, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होते. युवराज वाघ, अनंता अवचार, मनीषा शेळके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Protected Content