खासदार रक्षा खडसे यांनी केली रस्ता कॉक्रीटीकरण पूर्व पहाणी

WhatsApp Image 2019 12 20 at 7.54.52 PM

सावदा ता. रावेर प्रतिनिधी | केंद शासन अंतर्गत सुरू असलेल्या आमोदा-पाल भिकनगाव रस्त्याचे व सावदा शहर अंतर्गत रिंगरोडचे कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच शहर अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार असून त्याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी माहिती घेतली.

सावदा शहर अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याची पाहणी करतांना खासदार खडसे यांनी सबंधितअधिकारी वर्ग यांना तातडीच्या मौलिक सूचना दिल्या. याप्रसंगी सुनिल नेवे, गटनेते अजय भारंबे , समाजसेवक अतुल नेहते , कृऊबा सदस्य पंकज येवले, पत्रकार राकेशकुमार पाटील , अरबाज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content