Home राजकीय खडसेंचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही : शरद पवार

खडसेंचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही : शरद पवार


pawar khadse
 

औरंगाबाद (वृत्तसंस्था) खडसेंचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही, अशा शब्दात भाजपवर नाराज असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेची खुद्द शरद पवार यांनीच हवा काढून टाकली आहे. औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

 

‘एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही,’ असे संभ्रमात टाकणारे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवारांचे वक्तव्य म्हणजे खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. भाजपवर नाराज असलेल्या खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेला हवा मिळाली होती. परंतू औरंगाबाद येथे पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबाबत विचारले असता पवार यांनी ‘खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचे समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नाही,’ असे म्हटले आहे.


Protected Content

Play sound