अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा

जळगाव – लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नंदीनीबाई बेंडाळे महिला महाविद्यालया समोरील दुभाजक व कोर्ट चौकात महापालिकेची परवानगी न घेता वाढदिवसाचे बॅनर लावल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, “शहरातील नंदीनीबाई बेंडाळे महिला महाविद्यालयासमोरल दुभाजक आणि कोर्टचौकात अनधिकृतपणे वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेत तक्रार दिली होती.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिकेचे कार्यकारी कर अधिक्षक नरेंद्र चौधरी यांच्यासह किरकोळ वसुली विभागातील लिपीक अजय बिऱ्हाडे यांनी बुधवार १८ मे रोजी सकाळी ८ वाजता पाहणी केली असता त्यांना नंदीनीबाई बेंडाळे महिला महाविद्यालयासमोरल दुभाजक आणि कोर्ट चौकात अनधिकृतपणे वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले.

याबाबत अधिक चौकशी केली असता महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता अज्ञात व्यक्तीने बॅनर लावण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानुसार किरकोळ वसुली विभागातील लिपीक अजय बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: