एमएचटी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

33519051 stock vector illustration featuring the silhouettes of students taking an exam

मुंबई वृत्तसंस्था । राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने अर्थात सीईटी सेल १४ परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात महत्वाची मानली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर एमबीएची-सीईटी १४ आणि १५ मार्च रोजी होणार आहे. एलएलबी तृतीय वर्ष २८ जून आणि एलएलबी ५ वर्ष १२ एप्रिल रोजी होणार आहेत.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासमावेत बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होणार आहे. मेडिकल अभ्यासक्रमांच्या संदर्भातील सीईटी वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. तीन व पाच वर्षीय विधी (लॉ), बीई / बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर , हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड कोर्स आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्‍वास ठेवावा, असे आवाहन सीईटी सेल आयुक्‍त संदीप कदम यांनी केले आहे.

परीक्षा कालावधी
एमएचटी-सीईटी १३ ते २३ एप्रिल, एमबीए/एमएमएस १४ आणि १५ मार्च, एमसीए २८ मार्च, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट १६ मे, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट १० मे, एलएलबी ५ वर्षे १२ एप्रिल, एलएलबी ३ वर्षे २८ जून, बीपीएड ११ मे, बीएड/एमएड १२ मे,  एमपीएड १४ मे, बीए/बीएससी बीएड २० मे, एमएड २६ मे

Protected Content