जळगावात अवैध दारू विकणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगर भागात दोन ठिकाणी पोलीसांनी छापे टाकून अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विकणाऱ्या दोघांवर कारवाई करत साडेतीन हजार रुपयाची दारू हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, वाल्मिक नगर परीसरातील दोन ठिकाणी अवैधरित्या गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली त्यानुसार, स.फौ. दिनेशसिंग पाटील, पो.ना. अभिजित सैंदाणे, महिला पो.कॉ. सुवर्णा पाटील यांनी कारवाई करत वाल्मिक नगर परीरातील रहिवाशी महिला खटाबाई आनंदा सोनवणे (वय-45) रा. वाल्मिक नगर ही बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास गावठी हातभट्टी दारू विक्री करत असतांना आढळून आली. मात्र पोलीसांना पाहून खटाबाईने पळ काढला. घटनास्थळाहून पोलीसांनी 1 हजार 800 रूपयांची 35 लिटर दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसऱ्या घटनेत पो.कॉ. संजय शेलार, पो.कॉ. अमोल विसपूते, पो.कॉ. राहुल घेटे यांनी देखील त्याच परीसरात राहणाऱ्या शरद रामदास बाविस्कर (वय-35) रा. वाल्मिक नगर याकडे देखील अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करत असतांना त्याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील 1 हजार 600 रूपयांची दारू हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content