चाळीसगावच्या शविआचे राजेश टोपे यांना साकडे

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अत्यावश्यक गोळ्या व इंजेक्शन्सचा पुरवठा करावा यासाठी शहर विकास आघाडीने आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदनाच्या माध्यमातून साकडे घातले आहे.

आज मुुंबई येतील मंत्रालयात तालुक्यातील तसेच शहरातील कोरीनाग्रस्त रुग्णाच्या वाढती संख्या लक्षात घेता चाळीसगाव येथील ट्रामा केअर सेंटर येथे व्हेंटिलेटर आणि उपचारासाठी अत्यावश्यक अशा फेबिबुल्यू गोळ्या आणि रॅमिडिसिर इंजेक्शनचा पुरवठा करावा. ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचा गरज भागेल व उपचार सुरळीत होईल अशी मागणी केली. याप्रसंगी शहराध्यक्ष शाम देशमुख, माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील , नगरसेवक रामचंद्र जाधव , दीपक पाटील , जगदीश चौधरी आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य बंटी ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते दिपक कच्छवा उपस्थित होते. याप्रसंगी ना. राजेश टोपे यांनी तात्काळ राज्य सचिव अर्चना पाटील यांच्याशी सवांद साधून त्यांना याबाबतीत तात्काळ कार्यवाही करण्यास सांगितले.

Protected Content