संविधान जागर अभियानांतर्गत ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने संविधान जागर अभियानांतर्गत ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून ही कार्यशाळा ५ ते २८ एप्रिल दरम्यान होत आहे.

संविधान जागर अभियान या कार्यशाळेचे उद्घाटन 6 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 6-30 वा. महाराष्ट्राचे ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले. सविधान घराघरापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. सर्वसामान्य जनता संविधाना पासून अनभिज्ञ आहे. आपल्याला संविधान फक्त लग्न समारंभ आणि इतर वेळी भेट देऊन चालणार नाही तर त्या संविधानातील प्रास्ताविकेचे महत्त्व आणि अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.सध्या देशामधील वातावरण गढूळ होत चाललेला आहे यामध्ये संविधान विचार पेरणारी पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे असे विचार संभाजी भगत यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मांडले.

कार्यक्रमाचे  सुरुवात गौतम वाघ यांनी संविधानाची प्रास्ताविका वाचून केले. वैशाली निकम यांनी प्रमुख पाहुण्यांचा ओळख परिचय करून देत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना साव यांनी केले तर आभार प्रियंका कोवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संविधान जागर अभियानातील रश्मी गडलिंग, अणघा शेटे आणि सर्व उपस्थित साथीने प्रयत्न केले.

 

Protected Content