वेल्हाळे गावात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु…

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वेल्हाळा सबस्टेशन येथे झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना दिवसातून एक तास वीज दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके हातची जाण्याच्या मार्गावर आल्याने शेतकऱ्यांनी आज सबस्टेशनावर दोन तासापासून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

वीज वितरण कंपनीचा गलथान कारभारामुळे आजरोजी  वेल्हाळा गावातील शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीमुळे आत्महत्या करण्याची वेळ वेल्हाळा सब स्टेशनामुळे आली आहे. वेल्हाळा सब स्टेशनच्या माध्यमातून गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्यांना झीरोलोड शेडिंगच्या नावाखाली  एक तास वीज दिली जात आहे. यामुळे शेतातील कांदा, केळी, मका, गहू यासारखे पिके विजेच्या झीरो लोड शेडिंग नावाखाली संपण्याच्या मार्गावर आहे. आजरोजी विजेच्या त्रासाला कंटाळून पिकाचे होणारे नुकसान समोर दिसत असल्याने व कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबित आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास याला वेल्हाळा सब स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याची माहीत संतप्त शेतकऱ्यांनी दिली. तसेच या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात राजकारण करण्यात आल्याचे दिसून आले.

वेल्हाळा सब स्टेशनवर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला असतांना त्या मोर्चातील शेतकऱ्याने वीज कर्मचाऱ्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोर्चात आलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित आत्महत्या करणारा शेतकऱ्यास धावत जाऊन विजेचा तार पकडण्यास रोखले व त्वरित वेल्हाळा गावातील सर्व वीज बंद करण्यात सांगितले. ज्या अधिकाऱ्यांनी वेल्हाळा गावाला झिरो लोड शेडिंगचे आदेश दिले तो अधिकारी आल्याशिवाय एकही शेतकरी सब स्टेशन मधून उठणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. वेल्हाळा गावातील सर्व वीज बंद करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे किती नुकसान होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

शेतकऱ्याचा आत्महत्याचा प्रयत्न

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा सब स्टेशनच्या झिरो लोड शेडींग शेतकऱ्यांना मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी दहा वाजेपासून आक्रोश मोर्चा काढून अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क केला असता एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने संतप्त शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता सोबत आलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित शेतकऱ्यास पकडून आत्महत्या करण्यास थांबवले हे आंदोलन सुरू असताना तब्बल तीन तासानंतर भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांनी वेल्हाळा सब स्टेशनला सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला भेट दिली.

महाराष्ट्र राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून आज पावतो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देत आहे. एक बिल भरा तुम्हाला वीज देऊ असे अश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी बिल भरल्यानंतर आघाडी सरकारने आता नवीन फंडा सुरू करून शेतकऱ्यांना वेठीस धरून झिरो लोड शेडींग सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. या झालेल्या नुकसानाची पाहणी भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतात उन्हाच्या 45 डिग्री तापमानात जाऊन केली. यानंतर आमदारांनी शेतकरी व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या झोरी लोड शेडींग बंद करून शेतकऱ्यांना सिगल फेज वीज पुरवठा देण्यात यावा अशा सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झोरी लोड शेडींग कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना तब्बल दहा तास वीज पुरवठा देण्यात यावा व यादरम्यान वीज पुरवठा खंडीत करण्यात आला तर याची भर काढून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Protected Content