दस्तसंख्या नोंदणीचे गाठले सरासरी इष्टांक

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात गेल्या दीड दोन वर्षात संसर्ग प्रादुर्भावामुळे मुद्रांक नोंदणीवर परिणाम झाला होता, मात्र शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले सवलतीमुळे काही अंशी यात वाढ झाली असून, आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी २४० कोटीचे उद्दिष्ट होते, परंतु फेबृबारी २०२२ दरम्यान ते कमी करण्यात येऊन २२६ कोटींचे इष्टांक देण्यात आले. त्यानुसार मार्च २०२२ अखेर ८६ हजार ४६६ दस्त नोंदणीसह २२९ कोटी मुद्रांक शुल्क भरणा शासन तिजोरीत झाला असल्याचे सह जिल्हा निबंधक (नोंदणी) उमेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे

जिल्ह्यासह राज्यात कोविड संसर्ग प्रादुर्भावामुळे निर्बंध होते, यामुळे मुद्रांक, दस्त नोंदणी तसेच नोंदणी विवाहाची संख्येवर देखील बऱ्याच अंशी प्रभाव पडला. सप्टेंबर २०२० नंतर प्रादुर्भाव नियमांत शिथिलता आणि सवलत देण्यात आल्यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी आणि शासनाच्या महसुली उत्पन्न वाढीसाठी दस्त नोंदणी आणि नोंदणी विवाहासाठी सवलत देण्यात आली. कोविड काळात निर्बंध असूनही नोंदणीकृत दस्त संख्या अधिक होती त्यामानाने २०२१-२२ दरम्यान नोंदणीकृत दस्त नोंदणीवर काही अंशी परिणाम झाला असून मुद्रांक शुल्कात देखील घट झाली असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या चार वर्षाचा आढावा पाहता २०१८-१९ साठी १९३, २०१९-२० साठी २१४, २०२०-२१ १७२ तर २०२१-२२ २४० कोटी इष्टांक होते. त्यानुसार अनुक्रमे ८६११०- २१२, ७६३३० – २१९, ८३८४४ – १९५ आणि २०२२ मध्ये ८६४६८ नुसार २२९ कोटी रुपये मुद्रांक शुल्क वसुली झाली आहे.

कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक काळात २०२१ मार्च मध्ये नोंदणीकृत दस्त संख्या ९८७६ नुसार ३४ कोटी होती, तर २०२२ मार्च महिन्यात ९७२० नुसार ३० कोटी मुद्रांक शुल्क वसूल झाले आहेत. तर एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ४५९ नोंदणी विवाह नोंद झाली असून त्याद्वारे ६८ हजार ८५० रुपये नोंदणी फी महसूल शासनाला मिळाला असल्याची माहिती जिल्हा सह निबंधक नोंदणी अधिकारी शिंदे यांनी दिली.

Protected Content