कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ५१५ शेतकरी बांधवाना १७६.९६ मे. टन खताचा बांधावर पुरवठा

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी चालु खरीप हंगामात जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 35 शेतकरी गटांतील 515 शेतकरी बांधवाना 176.96 मे. टन खत पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर देण्यात आला आहे. शासनाच्या या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

खरीप हंगामास सुरुवात लवकरच होणार असुन शेतकरी बांधवाना वेळेवर बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी जाहिर करण्यात आली असुन शेतक-यांनी कृषी सेवा केंद्रावर येऊन बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि सोशल डिस्टंसींग न पाळले गेल्याने कोरोना विषाणुंचा फैलाव मोठया प्रमाणावर होऊ शकतो.

यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्याला लागणारे खत, बियाणे व किटकनाशके शेतकरी गटामार्फतच घ्यावे, यामुळे त्यांना बांधावर निविष्ठा उपलब्ध होणार असुन कृषि सेवा केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही. याकरीता कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. ठाकूर यांनी केले आहे.

Protected Content