तरूणांनो व्यसनाधिनतामध्ये न अडकता आपले स्वप्न साकार करा- गणेश पवार

चाळीसगाव, प्रतिनिधी | आजच्या तरूणांनी दिशाहीन होऊन व्यसनाधिनतामध्ये न अडकता उराशी बाळगलेला स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे असे प्रतिपादन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी रयत सेना शाखा फलकाचे उद्घाटन प्रसंगी केले.

तालुक्यातील बिलाखेड येथे रविवार रोजी रयत सेना शाखा फलकाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान आजच्या तरूणांना योग्य मार्गदर्शन न मिळत असल्याने ते दिशाहीन झाले आहे. तर असंख्य तरुण चुकीच्या मार्गाने जाऊन व्यसनाधिनतामध्ये अडकून पडले आहेत. यामुळे तरूणांनी आपले आई-वडील आपल्या शिक्षणासाठी घेत असलेले परिश्रम लक्षात घेतले पाहिजे. व जे स्वप्न त्यांनी बघितले आहे. ते पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी दाखवली पाहिजे तरच बेरोजगार हा शब्द खोडला जाऊ शकते असे प्रतिपादन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी यावेळी केले. त्याचबरोबर बेरोजगार तरुण सरकारी बँकेकडे कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र त्यांना बँक कर्ज देत नाही. अशा बेरोजगार तरुणांना कर्ज मिळवून देण्यासाठी रयत सेना प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बिलाखेड येथील आदिवासी कुटुंबाचे १५ लाख रुपये कर्ज बॅंकेने मंजूर केले. परंतु मंजूर झालेली रक्कम त्यांना न देता बँकेचे मॅनेजर व संबंधित दलालाने हडप केली. मात्र रयत सेनेच्या माध्यमातून ती रक्कम सदर आदिवासी कुंटुंबाना मिळवून दिली. असेही त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन पिंटु गायकवाड तर आभार अजय पाटील यांनी मानले.

यावेळी बिलाखेड रयत सेना शाखेच्या अध्यक्षपदी विशाल तोंडे, उपाध्यक्ष अजय पाटील ,कार्याध्यक्ष सागर मुलमुले, संघटक किरण पाटील, सचिव विनोद पाटील, सहसंघटक सोनु रावते , सहकार्याध्यक्ष हेमराज पाटील , सहसचिव संदीप मोरे , कोषाध्यक्ष विक्की धनगर , समन्वयक आकाश मराठे, प्रसिध्दी प्रमुख दिपक पाटील ,विभाग प्रमुख सुनील पाटील यांची निवड करण्यात आली.

 

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष संतोष निकुंभ ( संता पहेलवान ), प्रदेश कार्याध्यक्ष सुमित भोसले, कार्यक्रमास प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नितीन महाजन, अनिल पाटील, तमगव्हाण शाखेचे शुभम पाटील, प्रशांत पाटील ,तुषार पाटील, पिंपळवाड निकुंभ शाखेचे भरत कुटे , समाधान मांडोळे, विलास निकम ,कोदगाव शाखेचे कुलदीप पाटील, गोपाल पाटील, पातोंडा शाखेचे सागर जाधव, पिंटू गायकवाड भोरस शाखेचे सागर पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content