जळगाव प्रतिनिधी । मुंबई येथे चालू असलेल्या क्रुझ पार्टीवर एनसीबीचे कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली. यात अनेक बड्या असतील ना रंगेहात पकडून अटक करण्यात आले आहे. वानखेडे यांच्या कामगिरीला समर्थन देवून मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आज महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाला तरूणाई ड्रग्ज सारख्या अमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे देशाचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यातच मुंबई येथे चालू असलेल्या क्रुझ पार्टीवर एनसीबीच्या विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी समीर वानखेडे यांचे नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आले. यात सिनेअभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन यांच्यासह बड्या हस्त्यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आले आहे. या पार्टीत अडकलेले अनेक राजकीय नेते तसेच मंत्री नवाब मलिक यांना वचविण्याची धडपड सुरू आहे. ही कारवाई समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर ती वैयक्तिक स्तरावर जाऊन त्यांच्या कुटुंबावर ती नको ते खोटे आरोप केले जात आहे. नवाब मलिक हे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आहेत. वास्तविक नवाब मलिकांचा खात्याचा काहीही संबंध नसताना त्यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे व कुटुंबियांना टार्गेट केले आहे. एका अधिकाऱ्यावर वैयक्तिक स्तरावर जाऊन टार्गेट करणे, हे आपल्या लोकशाहीला घातक आहे. जर अशा प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची खच्चीकरण केले जात असेल तर भविष्यात कोणताच अधिकारी अशा कारवाईला धजावणार नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि पोलिस तपासात राजकीय लोकांनी हस्तक्षेप व दबाव टकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने अधिकारी समीर वानखेडे यांच्या कामगिरीबद्दल समर्थन देऊन मंत्री नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी, अशोक शिंदे, चेतन माळी, कृष्ण पानसांबळ, समाधान कोळी, रवींद्र वाणी, प्रणव डोलारे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.