मालेगावात बंदोबस्तात पुन्हा जळगावचे दोन पोलीस कोरोनाबाधीत आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील  मालेगावात बंदोबस्तासाठी गेलेल्या पुन्हा आणखी दोन पोलीस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात एक कर्मचारी पोलीस मुख्यालयात तर दुसरा पाचोरा येथे कार्यरत आहे. शुक्रवारी दोघांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे मालेगावात बंदोबस्तादरम्यान कोरोनाबाधीत झालेल्या जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांची संख्या आता चार वर पोहचली आहे. दरम्यान दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने जळगाव जिल्ह्यातील बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी जिल्ह्यात परतणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यातील 100 पोलीस कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. यातील एक दोन जण यापूर्वी कोरोनाबाधीत आढळून आले होते. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी बंदोबस्तावर नियुक्त जिल्ह्यातील दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले आहे. यात एक पोलीस मुख्यालयात तर एक पाचोरा येथे कार्यरत आहे. संबंधित दोघे कोरोनाबाधीत झाल्याच्या माहितीला अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे.

Protected Content