Home क्राईम भारत नगरातील युवतीची गळफास घेवून आत्महत्या

भारत नगरातील युवतीची गळफास घेवून आत्महत्या

0
111

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील भारत नगर येथील २० वर्षीय युवतीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय-२०) रा. भारत नगर, शिवाजी नगर परिसर जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, कोमल कांबळे ती युवती आपल्या आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. युवतीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. डॉ. रेणुका भंगाळे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा प्राथमिक तपास पोहेका संजय झाल्टे आणि महिला पोलीस कर्मचारी रेश्मा मालवणकर हे करीत आहे.

 


Protected Content

Play sound