पोलीस देवदूत बनले : अपघातातील जखमींच्या मदतीला धावले

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आंबेवडगावजवळ रस्त्यात अचानक आलेल्या नीलगायला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार २४ जुलै रोजी घडली. जखमींपैकी एकाचा प्रचंड रक्तश्राव होत होता. नेमक याचवेळी या रस्त्यावरुन जात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विनोद पाटील जात होते. त्यांनी जखमीला वेळेत रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचविले आहे. देवदूताप्रमाणे विनोद पाटील आले व त्यांनी जखमीचे प्राण वाचविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथील ताराचंद थावरू राठोड आणि सुभाष मोरशिंग राठोड ह दोघेही दुचाकीने रविवारी शेंदुर्णीकडून आंबेवडगावकडे येत होते. यादरम्यान आंबेवडगावजवळ जंगलातून अचानकपणे निलगाय आली.  व दुचाकीवर धडकली. या अपघात होवून दुचाकीवरील ताराचंद व सुभाष दोघेही रस्त्यावर पडले. यात सुभाष राठोड यांना गंभीर दुखापत होवून त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तश्राव होत होता. घटनास्थळी गर्दी झाली मात्र सर्व जण फोटो काढण्यात मग्न होते. जखमी मदतीसाठी ओरडत होते, मात्र कुणीही पुढे धजावले नाही. याचदरम्यान या रस्त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विनोद पाटील हे त्यांच्या चारचाकीने जात होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळी वाहन थांबवून नागरिकांच्या मदतीने जखमींना स्वत:च्या गाडीत बसविले. त्यानंतर जखमीला शहरातील विघ्नहर्ता या रुग्णालयात दाखल केले. जर जखमी सुभाष राठोड यास रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला असता, त्यांचे प्राण गेले असते, मात्र देवदूताप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी विनोद पाटील त्याच्या मदतीला धावून आले. विनोद पाटील यांच्यामुळे सुभाष राठोड यांचे प्राण वाचले आहे. जखमी राठोड यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी विनोद पाटील यांच्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले आहे.

Protected Content