हद्दपार असलेल्या दोन आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील हद्दपार असलेल्या दोन आरोपींना गुरूनानक नगर आणि खंडेराव नगरातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी गुरूवारी २४ नोव्हेंबर रेाजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाणे आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार व हद्दपार आरोपी यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, विजय पाटील, प्रीतम पाटील यांनी शहरातील गुरूनानक नगरात कोंबींग ऑपरेशन राबवून आरोपी सुनील उर्फ लखन भगवान सारवान (वय-34, रा. गुरुनानक नगर जळगाव) याला अटक केली आहे. त्याच्यावर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज पाटील, प्रमोद लाडवंजारी आणि किरण धनगर यांनी खंडराव नगरातून आरोपी समाधान हरचंद भोई (वय-28, रा. खंडेराव नगर, जळगाव) याला अटक केली. त्याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content