चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात बंद घरफोडी, महाविरण कंपनीच्या तारांची चोरी आणि इतर गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी २४ नोव्हेंबर रेाजी दुपारी २ वाजता कारवाई करत भुसावळ बसस्थानक परिसरातून अटक केली आहे. यासोबत असलेल्या इतर चौघांचा शोध घेणे सुरू आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शेख शकील शेख सलीम आणि शेख असिफ शेख अकबर दोन्ही रा. भुसावळ असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहे.

जळगाव जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी हे भुसावळ शहरातील बसस्थानक परिसरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ सुनील पंडित दामोदरे, आश्रफ निजामुद्दीन, दीपक पाटील, लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, ईश्‍वर पाटील, चालक मुरलीधर बारी अशा पथकाला भुसावळ येथे रवाना केले. गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी शेख शकील शेख सलीम आणि शेख असिफ शेख अकबर दोन्ही रा.भुसावळ यांना भुसावळ बसस्थानकाच्या आवारातून अटक केली.

दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी यावल, पहुर आणि जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील चोरीची कबुली दिली आहे. तसेच त्यांचे इतर साथीदारांची नावे देखील सांगितले असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. अटकेतील दोन्ही आरोपींना यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content