Home क्राईम रावेर येथे सायकल चोरट्यास अटक

रावेर येथे सायकल चोरट्यास अटक

0
90

रावेर प्रतिनिधी । बाजार करण्यासाठी आलेल्या तरूणाची सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील एकास दुचाकीसह रावेर पोलीसांनी अटक केली.

अधिक माहिती अशी की, सौरभ श्रीकृष्ण पाटील रा. शिंदखेडा ता.रावेर हे रावेर शहरात बाजार घेण्यासाठी २० सप्टेंबर रोजी सायकलने आला. शहरातील रूची मोटार शेजारी सायकल पार्क करून बाजार घेण्यासाठी गेला. अज्ञात चोरट्यांनी लावलेली दुचाकी चोरून नेली. त्यांनी शोधाशोध केली असता मिळून आली नाही. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पथक तयार करून इस्माईल शेख, पो.कॉ. तुषार मोरे, पो.कॉ. मनोज म्हस्के, पो.ना.महेंद्र सुरवाडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी विजय दनिकर महाजन (वय-३५) रा. कर्जोद ता. रावेर याला ताब्यात घेवून सायकल चोरी केल्याचे कबुल केले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास रावेर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी करीत आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Protected Content

Play sound