रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त ; पोलिस निरिक्षकांनी केले स्वागत

 

रावेर, प्रतिनिधी ।  रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त झाली आहे. चोख कायदा-सुव्यस्था हाताळनारे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांना या नविन बोलेरो कारमुळे कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्यात मदत होणार आहे.

भौतिकदृष्टया महत्व असलेले रावेर पोलिस स्टेशन कर्मचारी तसेच नविन गाडी देण्याची मागणी जूनी आहे. अखेर पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेश्यावरुन आज रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त झाली आहे. या नविन कारमुळे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात मदत होणार आहे.  आज रावेर पोलिस स्थानकात पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक, पोलिस उपनिरिक्षक मनोहर जाधव यांनी पेढे वाटप करून नविन बोलेरो कारचे स्वागत करण्यात आले.

 

Protected Content