माजी नगरसेवकाकडुन मालमत्ता हद्दीतील झाडाची विनापरवानगी कत्तल

जामनेर प्रतिनिधी । शहरातील माजी नगरसेवकाकडुन स्वतःच्या मालमत्तेतील जुने झाडे विनापरवानगी तोडुन नियम मोडीत काढले आहेत. 

जामनेर नगरपरिषदेचे माजी तथा व्यापारी अनिलकुमार बोहरा यांच्या मालकीचे जामनेर-जळगाव रस्त्यावर मोठे व्यापारी संकुलचे बांधकाम चालु असुन कामही पुर्णत्वास आले आहे. मात्र तेथीलच काहीशे जवळ असलेले जुने बाभळीचे अडसर ठरत असल्याचे दाखवुन बुंध्यापासुन कापुन टाकले. मात्र हे करत असताना त्यांनी त्यासाठी लागणारे आवश्यक नियम न पाळता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीही रितसर परवानगी न घेता मनमानी करत विना परवानगी मोठ्या झाडाची कत्तल केली. जागरूक वृक्षप्रेमी कपील शर्मा यांनी याकडे लक्ष देवुन लागलीच या प्रकाराबाबत संबधीतांवर कारवाई साठीचे मागणी तक्रार पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. दरम्यान बोहरा यांनी झाड तोडायची परवानगीचा अर्ज साधारणपणे ऑगस्ट महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्याचे सांगितले. परंतु झाड न तोडता बांधकाम विभागाने फांद्या वैगरे साफ करू मात्र बोहरांनी झाडच बुंध्यापासुन कापुन काढले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनोज पाटील यांचेशी बोलल्यावर त्यांनी याच्या तपासासाठी जामनेर पोलिस स्टेशनला पत्र दिले असल्याचे सांगितले.

Protected Content