रावेर येथे नववधू मेकअप कार्यशाळेचे आयोजन

 

रावेर, प्रतिनिधी। येथे जनमत प्रतिष्ठान व शायनिंग ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओ श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानकडून नववधू मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जनमत प्रतिष्ठान व शायनिंग ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओ श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सेमिनारला समाजसेविका उज्ज्वला देरेकर, नगरसेविका रंजना गजरे, नगरसेविका संजना वाणी, पोलिस पाटील वर्षा केर्‍हाळे , पाटील मॅडम, जंगले मॅडम, सरिता चौधरी, भारती चौधरी, प्रांजल मॅडम तसेच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे दीपक दाभाडे, हर्षाली पाटील व मराठी सिने अभिनेत्री पूजा मॅडम, शायनिंग क्लासेसचे संचालक संजय चौधरी, संतोष डिवरे उपस्थित होते. सेमिनार संपल्यानंतर सेमिनारचे सहभाग प्रमाणपत्र त्वरित वाटप करण्यात आले.

Protected Content