जामनेर तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांची बैठक उत्साहात

cdfa81c8 bbb8 418a be87 ab5006ecca29

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यात दोनशेहून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर्स तुटपुंज्या फीवर खेड्यापाङ्यांवर रात्र दिवस सेवा देतात. त्यांच्या विविध मागण्या मान्य होण्यासाठी मात्र, शासन दिरंगाई करत आहे . या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शेंदुर्णी येथे बैठक घेण्यात आली.

प्राथमिक आरोग्य अधिकारी व कम्युनिटी हेल्थ ऑकीटर या ५७१६ पदांची भरती प्रक्रियेत होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश व्हावा राज्यातील १८१६आरोग्य केंद्रे व १०५७९आरोग्य उपकेंद्रे येथे डॉक्टरांची नेमणूक व्हावी, १०८ रुणवाहीकेवर नियुक्ती व्हावी, राष्ट्रीय बालस्वास्थ योजनेअंतर्गत सदर डॉक्टरांची नेमणूक व्हावी यासह इतर मागण्या प्रलंबीत असून त्या तात्काळ सोडवण्यात याव्यात यासाठी संबधीत मंत्र्यांना निवेदन देऊन मागण्या मान्य करून घ्याव्यात, असा ठराव एकमताने झाला . मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची दिशा ठराविण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ . युवराज बारी होते.यावेळी कार्याध्यक्ष डॉ निलमकुमार अग्रवाल, डॉ.किरण सूर्यवंशी, डॉ.विजयानंद कूलकर्णी,डॉ . अजय सूर्वे, डॉ .मनोज विसपूते, डॉ . अविनाश पाटील , डॉ . सागर पंडित ,डॉ.डी.पी पाटील, डॉ.दिलीप साबळे, डॉ.अरूण चौधरी,डॉ .व्ही.टी पाटील, डॉ .एस.पी.पाटील, दिलीप साबळे, डॉ. दिपक पाटील,डॉ. प्रमोद पाटील व शेंदुर्णी डॉक्टर असोशिएशन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. देवानंद कुलकर्णी तर आभार प्रदर्शन मंगेश पाटील यांनी केले.

Protected Content