अखेर शेतकर्‍याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणार्‍या सावकारांवर गुन्हा दाखल

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मोहाडी येथील जगदीश रतनसिंग परदेशी या शेतकर्‍याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणार्‍या सावकारांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील जगदिश रतन सिंग परदेशी (वय५५) या शेतकर्‍याने सावकाराच्या कर्जाच्या छळाला कंटाळुन राहत्या घरातील छताला गळफास घेवुन आपली जीवन यात्रा संपविली. त्यांनी सावकारी करणार्‍या विजय बंडु कुमावत व प्रकाश बंडू कुमावत यांच्या कडुन सन २००० मध्ये दीड लाख रुपये कर्ज घेतलेले होते. व तीन एकर शेती खरेदी करुन दिली.परंतु संबंधित सावकार चक्क दिड लाख रुपयाचे ४० लाख रुपये किंवा शेतीवर ताबा मागत होते. आधीच निसर्गाच्या कोपामुळे हवालदिल झालेल्या जगदिश परदेशी हे संकटात सापडले होते. राजपूत यांनी गावातील प्रतिष्ठीत मंडळी यांच्या कानावर हा विषय घातला होता.त्यांनीही या प्रकरणात मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कुमावत यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.कुमावत यांनी पुन्हा पैशाचा तगादा लावल्याने ४० लाख रुपये इतकी रक्कम आणायची कुठुन हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने अखेर या विवंचनेत जगदिश राजपूत होते.कर्ज परत फेडीचा कोणताच पर्याय समोर दिसत नसल्याने शेवटी आत्महत्या हाच एकमेव पर्याय निवडून राजपूत यांंनी सावकारांच्या नावाने चिठ्ठी लिहुन राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आपली जीवन यात्रा संपविली.

त्यांचा मुलगा दर्शन हा बाहेरुन आल्या नंतर आपला जन्मदाता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आले.हा झालेला प्रकार गावातील गावकर्‍यांना सांगितला व नंतर मृतदेह जामनेर येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी आणण्यात आला. जगदिश यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परीवार असुन या घटनेने मोहाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधित सावकाराला अटक करत नाही तोपर्यंत राजपूत यांचा म्रतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होताच. मात्र समजुती नंतर त्यांनी अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर त्यांया पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, जामनेर पोलीस स्टेशनमध्ये सावकारी करणार्‍या विजय बंडु कुमावत व प्रकाश बंडू कुमावत यांचेवर कलम ३०७,५०६,३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींंचा पोलिस शोध घेत आहे.

Protected Content