रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची 30 लाखांत फसवणूक

fraud

भुसावळ प्रतिनिधी । रेल्वेत नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या भुसावळातील मोहित नगर येथील 40 वर्षीय तरूणाची पाच ते सात जणांनी 30 लाख रूपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ पोलीसात फसवेगिरी करणाऱ्यांविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित नगर भागातील रहिवासी प्रमोद रामदास अहिरे वय 40 हा आपल्या पत्नी व मुले तसेच आई-वडील अशा संपूर्ण परिवारा सहित राहतो. तरूणाची परिस्थिती गरिबीची व हलाखाची असल्याने हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. भुसावळातीलच सिद्धेश सुरेश पोतदार (वय-31) रा. मामाजी टॉकीज, रेश राजाराम पोतदार (वय-55) रा. मामाजी टॉकीज जवळ, सुभाष राजाराम पोतदार (वय-45) रा. भुसावळ रोड विष्णू प्लायमागे वरणगाव, श्रीकृष्ण तारापूरे रा. जळगाव यांच्यासह अज्ञात अनोळखी दोन ते तीन जण पुर्ण नाव पत्ता माहीत नाही यांनी 14 जानेवारी 2018 रोजी रेल्वेत नोकरी लावून देतो. तू आम्हाला काही कर आणि 30 लाख रुपये रोख रक्कम आणून दे तुझी नोकरी पक्की असल्याचे सांगितले.

त्यानंतर सिद्धेश पोतदार यांने, ‘मी रेल्वेत स्टेशन मास्टर असल्याचे सांगुन नोकरी करीत आहे’. असे सांगितल्यानंतर तरूणांने विश्वास ठेवत पत्नीचे व आईचे सोन्याचे दागिने काही नातेवाईकांकडून हात उसनवारी पैसे तर काही लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन वरील चारही जणांना वीस लाख रुपये रोख कॅश माझ्या घरी दिलेत तर दहा लाख रुपये रोख कॅश भुसावळातील साई पॅलेस मध्ये दिले अशाप्रकारे वरील इसमांना 30 लाख रुपये रोख रक्कम दिलेली आहे. रक्कम देतेवेळी माझ्या घरात रोशन राजकुमार मेहरा व शांताराम नरवाडे, रफिक ऊर्फ मुन्ना यांच्या समक्ष 30 लाख रुपये रोख रक्कम दिली. मात्र अद्यापपर्यंत नोकरी लागली नाही. याबाबत विचारणा केली तर सर्वांनी घरी येवून 28 एप्रिल 2019 रोजी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान प्रमोद अहिरे यांनी आपणास मारहाण व फसवणूक केल्याप्रकरणी तसेच आपल्या परिवाराच्या जिवीतास धोका असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन किंवा वेळ पडल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Add Comment

Protected Content