विजापूर-बंगळुरु मार्गावर चालत्या बसला आग ; पाच जणांचा होरपळून मृत्यू

कोल्हापूर (वृत्तसंस्था) चालत्या बसला अचानक लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्घटना विजापूर-बंगळुरु मार्गावर घडली आहे.

 

कर्नाटकमधील केआरहल्ली गावाजवळची कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस रात्री ९ वाजेच्या सुमारास विजापूरहून बंगळुरुला निघाली होती. एकूण २९ जण या बसमधून प्रवास करत होते. बसला अचानक आग लागली. या आगीत बसमधील पाच प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या आगीच कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. आगीने बसला पूर्णत: वेढल्याने बसमधील प्रवाशांचा आरडाओरडा ऐकू येत होता. तोपर्यंत बसने पूर्णपणे पेट घेतल्याने अनेकजण जखमी झालेत. तर या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Protected Content