तहसीलदारांनी कर्मचार्‍यांना धारेवर धरले

यावल प्रतिनिधी । योजनांना लाभ मिळण्यात विलंब होत असल्याने शेतकर्‍यांनी तहसीलदार जितेन्द्र कुवर यांची भेट घेवुन आपल्या समस्या मांडल्या असता तहसीलदारांनी तात्काळ दखल घेत संबंधीत अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याचा सुचना दिल्या आहेत.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी केन्द्र आणी राज्य शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान योजना, महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्त योजना या तात्काळ शासकीय कार्यालयात युद्धपातळीवर शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे कार्य केले जात आहे. जिल्हा सहकारी बँकेत मागील तिन महीन्यापासुन बिनव्याजी कोट्यावधी रूपये बँकेत जमा असताना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या कर्जमाफी करीता पाठविण्यात आली असुन या या शासकीय अनुदान विविध बँकांमध्ये पाठवण्यास विविध कारणांनी विलंब होत असल्या कारणाने शेतकर्‍यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधीत बँकेच्या माध्यमातून मागणीनुसार तालुकानिहाय ही रक्कम वितरीत करण्यात येत असुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी आलेली संपुर्ण रक्कम ही एकच बँकेत असल्याने त्या रक्कमेस इतर बँकांमध्ये जमा करण्यास विलंब होत असल्याने व शेतकरी बांधवांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी होणार्‍या उशीरामुळे शेतकरी चांगलेच हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे महसुल प्रशासनाकडुन शेतकर्‍यांना उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने बुधवारी अनेक शेतकर्‍यांनी तहसीलदार जितेन्द्र कुवर याची भेट घेवुन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी तहसीलदार यांनी शेतकर्‍यांच्या समस्या ऐकुन घेत यासंदर्भात महसुलपातळीवर कार्य करणार्‍यांना अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरत शेतकर्‍यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Protected Content