राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा

amali padarth virodhi din

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आंतराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला.

१८ महाराष्ट्र बटालियन एससीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपुत यांनी अंमली पदार्थांना आळा बसावा आणि समाज निकोप, आरोग्यदायी आणि भरभराटीकडे प्रवास करणारा असावा या उद्देशाने फैजपूर शहरात रॅली काढली. रॅली दरम्यान नशाबंदीच्या घोषणांनी शहर दणाणून उठले. बस स्थानक तथा विविध कॉलनी मध्ये जाऊन एनसीसी कॅडेटसनी नुक्कड नाटिका सादर केल्या. यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरिषदादा चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सपकाळे, शेखर महाजन , चेतन इंगळे, सुधीर पाटील, संजय बार्‍हे, तौसिफ तडवी, महेश पाटील, दुर्गेश महाजन, नितीन पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content