Home क्राईम यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून २० वर्षीय विवाहितेची हत्या ; पतीला अटक, माजी नगरसेवक...

यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून २० वर्षीय विवाहितेची हत्या ; पतीला अटक, माजी नगरसेवक पिता पोलिसांच्या ताब्यात

0
4

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील आयशानगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून २० वर्षीय विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याच्या खळबळजनक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत विवाहितेच्या पतीला अटक केली असून, संशयित आरोपीचे वडील तथा माजी नगरसेवक आरिफ खान गनी खान सुलेमानी यांना सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

यावल शहरातील आयशानगर परिसरात काल ही धक्कादायक घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने २० वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई केली.

या प्रकरणातील संशयित आरोपीचे वडील आरिफ खान गनी खान सुलेमानी हे यावलचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनाही पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हत्येच्या घटनेत आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच या गुन्ह्यामागे अन्य काही कारणे आहेत का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पत्नीच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीला उद्या, ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीच्या पोलीस कोठडीबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound