Home क्राईम कानळदा रोडवर कार आणि मालवाहू रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक ; रिक्षाचालक गंभीर...

कानळदा रोडवर कार आणि मालवाहू रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक ; रिक्षाचालक गंभीर जखमी

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव-कानळदा रोडवरील कानळदा गावाच्या पुढे पेट्रोल पंपाजवळ कार आणि मालवाहू पियाजो रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात रिक्षाचालक इब्राहिम रहीम पिंजारी (वय ३५, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक (एमएच ०५ सीए ३१२३) आणि मालवाहू पियाजो रिक्षा क्रमांक (एमएच १९ बीएम १९०४) यांच्यात कानळदा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात रिक्षाचालक इब्राहिम पिंजारी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी इब्राहिम यांना तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, या अपघातामुळे कानळदा रोडवरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची पोलिसांत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली आहे.


Protected Content

Play sound