Home Cities अमळनेर अमळनेरचे युवा पत्रकार डॉ. समाधान मैराळे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

अमळनेरचे युवा पत्रकार डॉ. समाधान मैराळे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

0
9

अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील युवा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांना पत्रकारिता व सामाजिक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. नाशिक येथे आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान उत्साहात संपन्न झाला.

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमात ७ जुलै रोजी प्रसारित झालेल्या भागात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत हॉट सीटवर सहभागी झालेले शरद राजपूत आणि अभिनेत्री रिया चित्ते यांच्या हस्ते डॉ. मैराळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आणि समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहणे, या योगदानाची दखल घेऊन डॉ. मैराळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक आणि पत्रकारितेच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांनी आनंद व्यक्त केला. “हा सन्मान म्हणजे आजवर केलेल्या कार्याची पोचपावती आहे. यामुळे समाजाच्या हितासाठी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. मैराळे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल अमळनेर परिसरासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


Protected Content

Play sound