सुनिल दाभाडे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्काराने गौरव

WhatsApp Image 2020 01 13 at 11.30.25 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांचा कलासाधना आर्ट अकॅडमी, नवीमुंबईतर्फे राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कलाक्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक उल्लेखनीय कार्याबद्दल कलासाधना आर्ट अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांना विश्वविख्यात जादूगार सतिश देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा राहिकाबाई मेघे विद्यालय ,ऐरोली ,येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संतोष राजपूत, प्रसिद्ध सुलेखनकार व संस्थेचे अध्यक्ष श्रीराम महाजन विनोद महाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content