गेल्या पाच वर्षांत महागाईच्या दराने गाठला उच्चांक

images 2 1

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या पाच वर्षांत महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून आलेल्या आकड्यांवरुन ही माहिती समोर आलीय. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

 

महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. भाज्यांच्या दरात तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच डाळी, मांस-मासे, दूध आणि इतर जीवनावश्यक गोष्टींमधल्या दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. याआधी जुलै २०१४ या महिन्यात महागाईचा दर ७.३९ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात हा दर ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता. तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात हा दर २.११ टक्के इतकाच होता.

जीवनावश्यक वस्तूचा दर वेगाने वाढत असल्याने किरकोळ महागाईचा दर झपाट्याने वाढत आहे. डिसेंबर महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूचा महागाई दर वाढून 14.12 टक्क्यांवर पोहोचला होता. डिसेंबर 2018 मध्ये हा दर शून्य ते 2.65 टक्क्यांच्या खाली होता. तर नोव्हेंबर 2019 मध्ये हा दर 10.01 टक्के होता. डिसेंबर 2019 मध्ये भाज्यांच्या किमतीत 60.5 टक्क्यांनी वाढ झाली होती. डाळींच्या किमतीत 15.44 टक्क्यांनी, मांस-माशांचे दर 9.57 टक्के, अंड्यांचे दर 4.45 टक्क्यांनी वाढले आहेत. भाज्यांच्या दरात गेल्या कित्येंक दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या वाढत्या दरामुळे डिसेंबर महिन्यात सर्वाधिक महागाई होती. याचा फटका सामान्यांना पडला. एवढंच नाही तर पेट्रोल- डिझेल दरमात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

Protected Content