लान्सनायक नजीर वाणी यांना मरणोत्तर अशोकचक्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था । लान्सनायक नजीर वाणी यांना अशोकचक्र जाहीर करण्यात आले असून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले काश्मिरी जवान ठरले आहेत.

लान्सनायक नजीर वाणी हे दहशतवादी होते. मात्र हा मार्ग सोडून ते भारतीय लष्करात सहभागी झाले होते. ते लष्करातील ३४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. मागील वर्षी शोपियाँ जिल्ह्यात लष्कराने केलेल्या कारवाईत त्यांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले होते. या ऑपरेशनदरम्यान ते हुतात्मा झाले होते. दहशतवाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईची दखल घेत त्यांना यापूर्वी दोनदा लष्कराकडून सन्मान करण्यात आले असून, लष्कराचे पदकही मिळाले आहे. नजीर यांचे कुटुंब काश्मीर खोर्‍याच्या कुलगाम जिल्ह्यातील चेकी अश्मुजी गावात राहत आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत. अशोक चक्र हा लष्करातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले काश्मीरी ठरले आहेत.

Add Comment

Protected Content