रावसाहेब दानवेंनी दिला पदाचा राजीनामा

Raosaheb Danve

मुंबई प्रतिनिधी । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून लवकरच येणा-या राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या राज्यातील नेतृत्वात बदल होणार आहे.

गेल्या मे महिन्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे यांची निवड भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली होती. दानवेंच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात भाजपाने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. मात्र गेल्या 5 वर्षांत रावसाहेब दानवे हे त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार अडचणीत आले. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंवर चौफेर टीका झाली होती.

Protected Content