न्यायालयाच्या अवहेलना प्रकरणात वरिष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी ; २० ऑगस्टला शिक्षेसंबंधीची सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने अवहेलना प्रकरणात वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी २० ऑगस्ट रोजी शिक्षेसंबंधीची सुनावणी होणार आहे. दरम्यान, प्रशांत यांनी सरन्यायाधीश एस.ए बोबडे आणि ४ माजी सीजेआयच्या विरोधात ट्विट केले होते.

 

नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यावर प्रशांत भूषण यांची टिप्पणी केली होती. तर दुसऱ्या ट्टिटमध्ये प्रशांत भूषण यांनी कथितरित्या लिहिले होते की, न्यायव्यवस्था लोकशाही वाचवण्यासाठी काहीही करत नाही. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी न्यायमूर्ती बोबडे यांनी कोरोना काळात न्यायालये बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र ट्वीटची स्वत: दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध अवमान कार्यवाही सुरु केली होती. न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांच्या ट्विट्सवर निकाल दिला. खंडपीठाने म्हटले की, कंटेम्नर (अवमान करणारा) विरोधातील आरोप गंभीर आहेत. न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना नोव्हेंबर २००९ मध्ये देखील सर्वोच्च न्यायालयाने अवमाननेची नोटीस दिली होती. तेव्हा त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांवर टिप्पणी केली होती. अवमान नोटिसाला उत्तर देताना वकील भूषण यांनी सरन्यायाधीशांवर टीका केल्याने सर्वोच्च न्यायालयाचे मोठेपण कमी होत नाही. सर्वोच्च न्यायालयात सर्वसाधारण सुनावणी न झाल्याने अत्यंत खर्चीक दुचाकी चालविणाऱ्या सरन्यायाधीशांविषयी ट्विट करताना टिप्पणी केली होती. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दोषी ठरवले आहे. तर २० ऑगस्ट रोजी शिक्षेसंबंधीची सुनावणी होणार आहे.

Protected Content