प्रवाशाची लूट करणाऱ्या संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाश्याच्या खिश्यातून 39 हजाराची रोकड काढून घेत कारमधून ढकलून दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या लुटारुंच्या टोळीतील संशयिताला अटक केली होती तीन दिवसांच्या कोठडीत बरीचशी माहिती या संशयीताकडून प्राप्त होणार असल्याने पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

घटना अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल प्रीतम पार्कजवळून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रिक्षाच्या शोधात असताना “लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने कार थांबली. कारमधील तरुणांनी मुंबईच्या मेहुल इंडस्ट्रीजचे विक्री प्रतिनिधी रोहिदास रुखमाजी गायकवाड यांना हात धरून कारमध्ये ओढले. खिशातील 39 हजार 250 रुपये रोख काढून घेत कारमधून ढकलून दिल्याची घटना शनिवारी (ता.14) रात्री पावणेदोनच्या सुमारास घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी या लुटारुंच्या टोळीतील संशयिताला अटक केली होती तीन दिवसांच्या कोठडीत बरीचशी माहिती या संशयीताकडून प्राप्त होणार असल्याने तपासाधिकाऱ्यांच्या मागणीनूसार न्यायालयाने अतिरीक्त 2 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबईच्या मेहुल इंटरप्रायझेस या कंपनीचे विभागीय विक्री अधिकारी रोहिदास रुखमाजी गायकवाड (वय 35, रा. घाटकोपर) कंपनीच्या कामासाठी बुधवारी (ता.11) गिरी वाघेला (विक्री व्यवस्थापक, मुंबई) जळगावमध्ये आले होते. एमआयडीसीतील प्रीतम पार्क हॉटेलबाहेरुन रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी शिक्षा शोधत असतानाच कारमधून आलेल्या लुटारुनी त्यांना बळजबरीने कारमध्ये ओढून खिशातून 39 हजार 250 रुपये काढून घेत गाडी बाहेर ढकलून दिले होते. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी जबरीलूटचा गुन्हा दाखल होवून पोलिस पथकाने मंगलराव खयालीरामजी राव (वय 30, रा. इदगाह मोहल्ला, ता. नागदा, जि. उज्जैन) याला सोमवारी अटक केली होती. न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावल्यावर आज कोठडी पुर्ण होवून पुन्हा न्या अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केल्यावर संशयीताला 2 दिवस अतिरीक्त पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. जी.एम. बारगजे यांनी कामकाज पाहिले.

Protected Content