मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण केली जाते. माझी शेवटची इच्छा कृषी कायदे मागे घ्यावी अशी आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत,  अशी चिठ्ठी लिहून आज दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन सुरु होऊन 100 दिवस उलटले आहेत. त्यानंतरही सरकारने मागण्या मान्य न केल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आज  आणखी एका आंदोलक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. सुसाईड नोट लिहून आपल्या मृत्यूला कृषी कायदे जबाबदार असल्याचं म्हटलं. आहे 

आत्महत्या करणारा शेतकरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील होता. त्यांनी टिकरी बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणापासून  जवळपास 7 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं.  केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या 49 वर्षीय शेतकऱ्याने  एक सुसाईड नोट लिहिली आहे. दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन सुरुच आहे. हे आंदोलन सुरु होऊन तब्बल 100 दिवस उलटले आहेत.

बहादुरगड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विजय कुमार म्हणाले, “पीडित शेतकरी राजबीर हे हिसार जिल्ह्यातील रहिवासी होते.” काही शेतकऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकताना पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली.

सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, “माझ्या आत्महत्येच्या निर्णयाला तिन्ही कृषी कायदे जबाबदार आहेत. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेऊन माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी.”

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या हरियाणाच्या जींदमधील एका शेतकरी आंदोलकाने मागील महिन्यात टिकरी बॉर्डरपासून 2 किलोमीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याआधी हरियाणातील एका शेतकऱ्याने टिकरी बॉर्डरवर विष पिऊन आत्महत्या केली होती. त्याचा नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील एका रुग्णालयात मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये पंजाबमधील एका वकिलाने टिकरी बॉर्डरवरील आंदोलनापासून काही किलोमीटरवर विष पिऊन आत्महत्या केली होती.

Protected Content