Home Cities चोपडा ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा

0
47

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये  ८ मार्च  जागतिक महिला दिवस ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. 

संस्थेच्या  सदस्या  डॉ. तृप्ती  पाटील यांच्या हस्ते शारदा देवीच्या  प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास ज्यु. के. जी, सिनि.के. जी. व इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी व पालक माता,भगीनी सहभागी झाले होते. शिक्षिका विजया लांडगे यांनी प्रास्तविक केले तसेच महिला दिनाबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीयस्थांवरून बोलतांना  डॉ. तृप्ती  पाटिल यांनी महिला सशक्तिकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे. बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भुमिका बदलली आहे .ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भुमिकाव्यतिरिक्त अधिकारी ,वैज्ञानिक ,शिक्षक ,कर्मचारी अशा अनेक रुपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत आणि तिने आपल्या कर्तृत्वाने त्यांना अधिक चमक दिली आहे. स्त्री ही आज कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे असे महिला दिनाचे महात्म्य सांगितले. तसेच  सध्याच्या करोनाच्या भीषण परिस्थितीत खास विद्यार्थ्यींनींना घरी राहा, सुरक्षित राहा, खूप अभ्यास करा व आदर्श व्यक्तिमत्त्व  होण्याच्या व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नितेश वाघ यांनी आभार मानले. यशस्वीपणेतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन, समन्वयक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले. 


Protected Content

Play sound